चिंताजनक! नगरमध्ये GBS चे 4 रुग्ण आढळले

चिंताजनक! नगरमध्ये GBS चे 4 रुग्ण आढळल

 

नगरकरांसाठी एक चिंताजनक बातमी आहे. GBS व्हायरसने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये थैमान घातले आहे. अशातच आता अहिल्यानगर शहरातील रुग्णालयात जीबीएसचे 4 रुग्ण आढळले आहेत.

 

मात्र हे चौघंही रुग्ण शहराबाहेरील असून एकाला पुण्याच्या ससूनमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे. तर इतर तिघांवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शातच आता त्या चौघांची प्रकृती स्थिर असून सुधारणा होत असल्याची माहिती मिळाली आहे. हे रुग्ण आष्टी, वाकोडी, राहुरी तालुक्यातील आहेत. 

 

मात्र आता त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे.