आमदार सुरेश धस यांच्या बद्दल बोलायचं तर खऱ्या अर्थाने चर्चेत आले ते सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्यानंतर ज्या प्रकारे त्यांनी संबंधित विषय विधानसभेत मांडला त्यानंतर…
एखादी व्यक्ती ज्यावेळी एवढ्या ताकदीने आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने विधानसभेत एखादा प्रश्न मांडते त्यावेळी निश्चित त्या गोष्टीसाठी आणि त्या व्यक्तीच्या अभ्यासाची आणि अनुभवाची एक मोठी पार्श्वभूमी असते हे या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवावे लागेल.
चार वेळा विधानसभेत आणि एकदा विधान परिषदेत निवडून जाणारे सुरेश धस हे त्यामानाने महाराष्ट्राच्या विधिमंडळ राजकारणातील ज्येष्ठ सदस्य म्हणावे लागतील.
वयाच्या 29 व्या वर्षी आमदार झालेले सुरेश धस हे त्यानंतर 2004 आणि 2009 च्या निवडणुकीमध्ये सलग विजय झाले. 2014 च्या निवडणुकीमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला, परंतु त्यानंतर लगेचच 2017 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून विधान परिषदेमध्ये निवडून येण्याचा चमत्कार केला. त्या चमत्काराची गोष्ट नंतर एखाद्या ब्लॉगमध्ये सांगितले जाईल. त्यानंतर 2019 मध्ये सुरेश धस यांना भाजपाने उमेदवारी न देता त्या वेळचे विद्यमान आमदार भीमराव धोंडे यांना उमेदवारी दिली. 2019 च्या निवडणुकीमध्ये भीमराव धोंडे यांचा पराभव होऊन आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बाळासाहेब आजबे निवडून आले. 2024 ला विधान परिषदेची सदस्यत्वाची मुदत संपल्यानंतर सुरेश धस यांनी आपण विधानसभा लढवणार हे स्पष्ट केले त्याप्रमाणे रणनीती आखली आणि आपर्यंत त्यांच्या राजकीय जीवनातील उत्तुंग असे यश त्यांनी प्राप्त करून 77000+ मताधिक्यासह त्यांनी विजय प्राप्त केला.